जहाँ चार यार मिल जायें..., हिटमॅन रोहितचे मित्रांसोबतचे फोटो व्हायरल

4 जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याचे सोशल मीडियावर मित्रांसोबतचे काही खास फोटो व्हायरल झाले आहेत.

रोहित या व्हायरल फोटोंमध्ये मित्रांसह मजा- मस्ती करताना आणि हसताना दिसतोय.

रोहित एका उद्यानात त्याच्या 3 मित्रांसोबत निवांत बसलेला दिसतोय. रोहितचे सरावानंतरचे हे फोटो असल्याचं म्हटलं जात आहे.

काही दिवसांआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याने VHT स्पर्धेदरम्यान रोहितसोबतचे फोटो पोस्ट केले होते.

रोहितची न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

रोहितने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सिक्कीम विरुद्ध 150 धावांची चाबूक खेळी केली होती.

क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजमध्येही तशीच तडाखेदार खेळी अपेक्षित आहे.