11 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
अर्शदीप सिंह हा टीम इंडियाचा टी 20i क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
अर्शदीप सिंह याने नवी कार खरेदी केली आहे. अर्शदीपने मर्सिडीज एएमजी जी 63 SUV कार खरेदी केली आहे. अर्शदीपने या कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अर्शदीपच्या या कारचा बाहेरील रंग हा काळा तर आतील बाजूचा रंग लाल आहे. या कारची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे.
अर्शदीपने काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे असलेली टोयाटो फॉर्च्युनर मॉडीफाय केली होती. अर्शदीपने मॉडीफाय केलेल्या कारचा व्हीडिओ पोस्ट केला होता.
अर्शदीप वनडे आणि टी 20I संघातील प्रमुख गोलंदाज आहे. अर्शदीपने आतापर्यंत भारताचं 11 वनडे आणि 68 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
अर्शदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 तर टी 20I मध्ये 105 विकेट्स मिळवल्या आहेत.
तसेच अर्शदीप टी 20I वर्ल्ड कप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विजेत्या संघातील सदस्य आहे.