सध्या सोशल मीडियावर मोहम्मद शमीच नाव सानिया मिर्झासोबत जोडल जातय. या दरम्यान शमीने एक गुड न्यूज दिली आहे. 

दुखापतीमुळे शमी बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. आता त्याने ट्रेनिंग  स्टार्ट केलय. 

मोहम्मद शमीचा रिकवरी पीरियड सुरु झालाय. त्याने जीममध्ये ट्रेनिंग सुरु केलीय. 

शमी बंगळुरुत NCA मध्ये आहे. तिथे तो ट्रेनर्स सोबत हँड रोटेशनचा व्यायाम  करताना दिसला. 

शमी जीममधील स्पेशल मेडिसिन बॉल्सने ट्रेनिंग करताना दिसला. त्याने आपल्या खांद्यावर काम केलं. 

मोहम्मद शमीवर लंडनमध्ये ऑपरेशन झालं. त्याच्या पायाच्या घोट्याला  दुखापत झाली. 

ODI वर्ल्ड कप 2023 फायनल नंतर शमी एकही सामना खेळलेला नाही. त्याच्या पुनरागमनाला 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.