IND vs SA : पराभवानंतर कोचिंगवर प्रश्न, गंभीर शास्त्री-द्रविड यांची कामगिरी कशी?

17  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

दक्षिण आफ्रिकने भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी पराभव केला. त्यानंतर हेड कोच गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भारताने गंभीरच्या मार्गदर्शनात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मात्र मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये भारताला संघर्ष करावा लागतोय.

गंभीरने आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामन्यांमध्ये कोचिंग केलंय. त्यापैकी टीम इंडियाचा 9 सामन्यांमध्ये पराभव आणि 7 सामन्यांमध्ये विजय झालाय.

रवी शास्त्री हे कोच असताना भारताने 43 पैकी 25 कसोटी सामने जिंकले होते. तर 13 सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला होता.

द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारताने 24 पैकी 14 कसोटी सामने जिंकले. तर 7 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 2027 आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत आहे.

भारतीय फलंदाजांनी इडन गार्डन्समध्ये चांगली कामगिरी न केल्याने पराभव झाला, अशी गंभीरने प्रतिक्रिया दिली.