जसप्रीत बुमराहचा आणखी एक कारनामा, पॅट कमिन्सचा रेकॉर्ड ब्रेक

23  जून 2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला आहे. 

जसप्रीत बुमराह याने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. 

बुमराहने अवघ्या 83 धावांच्या मोबदल्यात यजमान इंग्लंडच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला

बुमराहने यासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला मागे टाकलं. 

बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. 

बुमराहने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 

तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत 10 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केलीय. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या