24 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने एकूण 8 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
टीम इंडिया गतविजेता आहे.त्यामुळे भारतासमोर ही ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान आहे.
भारताचा एक खेळाडू आशिया कप स्पर्धेतील एकही सामन्यात पराभूत झालेला नाही. त्यामुळे भारतासाठी हा खेळाडू लकी आहे.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याची आशिया कपमधील आकडेवारी जबरदस्त आहे. बुमराह या स्पर्धेतील सामन्यात खेळला आणि भारत पराभूत झाला, असं कधीच झालं नाही.
बुमराह या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 13 सामन्यांत प्लेइंग ईलेव्हनमध्ये होता. त्यापैकी भारताने 12 सामने जिंकले. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
बुमराह व्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्याची या स्पर्धेतील विजयी टक्केवारी ही 84.6 अशी आहे.
टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. भारतासमोर यूएईचं आव्हान असणार आहे.