सिराजच्या 5 विकेट्स म्हणजे विजयाचे संकेत, आकडे सांगतात सर्वकाही
4 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर 6 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला.
मोहम्मद सिराज याने ओव्हल कसोटीतील दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 तर पहिल्या डावात 4 अशा एकूण 9 विकेट्स घेतल्या.
सिराजला त्याने घेतलेल्या या 9 विकेट्ससाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
सिराजने जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतल्यात तेव्हा भारताने सामना गमावला नाही.
सिराजने 5 वेळा कसोटीत 5 विकेट्स घेतल्या.भारताचा त्यापैकी 4 वेळा विजय झाला. तर एकदाच सामना अनिर्णित राहिला.
अर्थात सिराजने 5 विकेट्स घेणं हे भारतासाठी जवळपास सामना जिंकण्याचे संकेत आहेत.
मोहम्मद सिराज इंग्लंड-इंडिया कसोटी मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा