शुबमनसेनेचा कारनामा, 21 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
4 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने ओव्हलमध्ये इंग्लंडला पराभूत करत 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली.
मोहम्मद सिराज याच्या 5 आणि प्रसिध कृष्णा याच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं.
भारताचा हा या मैदानातील सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला. भारताने याआधी 1971 नंतर 2021 मध्ये इंग्लंडला लोळवलं होतं.
भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील हा सर्वात कमी धावांच्या फरकाने जिंकलेला सामना ठरला.
भारताने याआधी 2004 साली मुंबईत ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी मात केली होती. मात्र आता 21 वर्षांनी हा रेकॉर्ड ब्रेक झालाय.
कसोटी मालिका बरोबरीत राहिल्याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी शेअर करण्यात आली.
कर्णधार शुबमनने या मालिकेत सर्वाधिक 754 धावा केल्या. शुबमन मालिकावीर ठरला. तर मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा