ऋचा घोषचा कारनामा, 12 षटकार ठोकत धमाका 

2 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाची विकेटकीपर ऋचा घोष झंझावाती बॅटिंगसाठी ओळखली जाते. ऋचाने वर्ल्ड कप फायनलमध्ये 141 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या.

ऋचा घोष हीने फायनलमध्ये 2 सिक्स लगावले. ऋचाने यासह एका विक्रमाची बरोबरी केली.

ऋचाने वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावले. ऋचा यासह या स्पर्धेत सर्वाधिक 12 षटकार लगावणारी पहिली भारतीय फलंदाज ठरली.

ऋचाने भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीला मागे टाकलं. हरमनप्रीतने 2017 साली 11 षटकार लगावले होते. तसेच ऋचाने डीएंड्रा डॉटिनच्या विक्रमाची बरोबरी केली.

ऋचाने यंदाच्या वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत 235 रन्स केल्या. ऋचाने या दरम्यान 1 अर्धशतक झळकावलं.

ऋचाने या स्पर्धेत टीम इंडियासाठी फिनीशर म्हणून भूमिका बजावली. ऋचा अखेरच्या 10-15 ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येते.

ऋचाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी फेरीत 77 बॉलमध्ये 94 रन्स केल्या होत्या.

ऋचा घोष हीने टीम इंडियासाठी 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार 111 धावा केल्या आहेत.

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स