ऋषभ पंत धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या उंबरठ्यावर, 21 जूनला कारनामा करणार?
20 जून 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 359 धावा केल्या.
टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज आणि उपकर्णधार ऋषभ पंत याने 102 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 65 रन्स केल्या.
टीम इंडियासाठी पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुबमन गिलने शतक केलं.
तर पंतकडे शतक करुन माजी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याचा 6 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतकं केली आहेत.
त्यामुळे पंतने दुसऱ्या दिवशी आणखी 35 धावा केल्यास त्याचं सातवं कसोटी शतक पूर्ण होईल.
पंत यासह धोनीला मागे टाकत टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक शतकं करणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरेल.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा