भारताचे 4 खेळाडू कटकमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज, पहिलाच सामना ठरणार खास

9 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20I मालिकेतील पहिला टी 20I सामना 9 डिसेंबरला होणार आहे. 

बुमराह, संजू, तिलक आणि हार्दिक या चौघांना या सामन्यात खास कामगिरी करण्याची संधी आहे. 

हार्दिक पंड्या-जसप्रीत बुमराह या दोघांना सारखीच कामगिरी करण्याची संधी आहे.

हार्दिकला टी 20I क्रिकेटमध्ये 100 विकेट्ससाठी 2 तर जसप्रीत बुमराह याला 1 विकेटची गरज आहे.

आतापर्यंत टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह यानेच टी 20I क्रिकेटमध्ये विकेटचं शतक पूर्ण केलं आहे.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांना टी 20I क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.

तिलक वर्माने टी 20I कारकीर्दीत 996 तर संजूने 995 धावा केल्या आहेत.