शुबमनला वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता वैभव सूर्यवंशीने पछाडलं

21 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

वैभव सूर्यवंशी U19 आशिया कप फायनलमध्ये अपयशी ठरला. वैभवने 26 धावा केल्या. मात्र वैभवने यासह खास कामगिरी केली.

वैभवने या सामन्यात 10 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 26 धावा केल्या.

वैभवने या स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 261 धावा केल्या. 

वैभवने यासह एका U19 आशिया कप स्पर्धेत धावांबाबत शुबमनला पछाडलं. शुबमनने 2016-17 मध्ये 5 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या होत्या.

मात्र वैभवला पहिलं स्थान काबीज करता आलं नाही. एका U19 आशिया कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक 370 धावांचा विक्रम उन्मुक्त चंद याच्या नावावर आहे.

वैभवला उनमुक्त चंद याचा रेकॉर्ड ब्रेक करता आला नाही.  मात्र वैभवने या एका स्पर्धेच्या हंगामात खास कामगिरी केली.

वैभव अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक 20 षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला.