इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार

18  जून 2025

Created By:  संजय पाटील

भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

शुबमनची कसोटी कर्णधार म्हणून पहिलीच वेळ असल्याने त्याच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. इंग्लंडमध्ये विजय मिळवणं भारतीय कर्णधारांसाठी आव्हानात्मक राहिलंय.

इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये 3 सामने जिंकले आहेत.

विराटने 2018 साली कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकला. त्यानंतर विराटने टीम इंडियाला 2022 साली 2 सामने जिंकून दिले होते.

दिग्गज कपिल देव यांनी टीम इंडियाला इंग्लंडमध्ये 2 सामने जिंकून दिले आहेत. देव या यादीत दुसऱ्या स्थानी

टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला महेंद्रसिंह धोनी यालाही इंग्लंडमध्ये काही खास करता आलं नाही. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये एकमेव सामना जिंकला.

तसेच सौरभ गांगुली, अजित वाडेकर आणि राहुल द्रविड या तिघांनी भारताला प्रत्येकी 1-1 सामन्यात इंग्लंडमध्ये विजयी केलं होतं.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या