वर्ल्ड चॅम्पियन ऋचा घोष गोल्ड बॅट-बॉलने होणार सन्मानित, CABची घोषणा

5 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

भारताच्या या ऐतिहासिक विजयात युवा खेळाडू ऋचा घोष हीने बॅटिंग आणि विकेटकीपिंगसह दुहेरी योगदान दिलं.

ऋचाने अंतिम सामन्यात अखेरच्या क्षणी 34 धावांची निर्णायक खेळी केली. तसेच ऋचाने दक्षिण आफ्रिकेची अनुभवी ऑलराउंडर मारिजान काप हीचा कॅच घेतला. 

वर्ल्ड कप विजयी संघातील सदस्य म्हणून कॅब अर्थात बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून ऋचाचा खास सन्मान करण्यात येणार आहे. 

ऋचाला 8 नोव्हेंबरला इडन गार्डन्समध्ये सोन्याचा मुलामा असेलला बॅट आणि बॉल देण्यात येणार आहे. बॅटवर गांगुली आणि बॉलवर झुलन गोस्वामीची स्वाक्षरी असणार आहे.

कॅबचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. 

ऋचाने वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 8 सामन्यांमध्ये 12 षटकारांसह एकूण 235 धावा केल्या.

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स