कॅप्टन शुबमन गिलकडून सर व्हीव्हीयन रिचर्ड्स यांची बरोबरी

28 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

शुबमन गिल याने कसोटी क्रिकेटमध्ये माजी दिग्गज सर व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुबमनने इंग्लंडमध्ये ही कामगिरी केली आहे.

शुबमनने इंग्लंडमध्ये कमी डावात 4 कसोटी शतकं करण्याबाबत व्हीव्हीयन रिचर्ड्स यांची बरोबरी केली. दोघांनी 10 कसोटी डावात ही कामगिरी केली.

शुबमन आणि व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्यापुढे सर डॉन ब्रॅडमॅन आहेत. ब्रॅडमॅन यांनी 7 डावात 4 शतकं केली होती.

शुबमन एका कसोटी मालिकेत 4 शतकं करणारा डॉन ब्रॅडमॅन आणि सुनील गावसकर यांच्यानंतर पहिला आणि एकूण तिसरा कर्णधार आहे.

शुबमन सुरु असलेल्या इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज आहे. शुबमनने 4 कसोटींमध्ये आतापर्यंत 722 धावा केल्यात.

शुबमनला आता विदेशात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा सुनील गावसकर यांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. 

गावसकरांनी 1971 मध्ये विंडीज विरुद्ध 774 धावा केल्या होत्या. शुबमनला हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी अवघ्या 53 धावांची गरज आहे.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या