टीम इंडियातील काही खेळाडूंनी घटस्फोटीत महिलांशी लग्न केलंय

16 November 2023

Created By: Chetan Patil

माजी क्रिकेटपटू मुरली विजयने दिनेश कार्तिकची घटस्फोटीत पत्नी निकितासोबत लग्न केलंय

दिनेश कार्तिकसोबत राहत असताना निकिता आणि मुरली विजय यांचं अफेअर सुरु झालं होतं.

दिनेश कार्तिकला याबाबत समजल्यानंतर दोघांनी परस्परांच्या सहमतीने घटस्फोट घेतला होता

टीम इंडियाचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी देखील घटस्फोटीत महिलेशी लग्न केलं आहे.

अनिल कुंबळे यांच्या पत्नीचं नाव चेतना आहे. त्यांचं लग्न झालं तेव्हा चेतना यांना एक मुलगी होती.

अनिल कुंबळे आणि चेतना यांचं 1999 मध्ये लग्न झालं होतं.

टीम इंडियाचा गब्बर अशी ख्याती असलेला फलंदाज शिखर धवननेदेखील घटस्फोटीत आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं.

पण काही दिवसांपू्र्वीच शिखर धवन आणि आयशा यांचा घटस्फोट झाला.

टीम इंडियाचा वेगवान फलंदाज मोहम्मद शमीने देखील घटस्फोटीत महिलेशी लग्न केलं होतं.

मोहम्मद शमीने हसीन जहां हिच्यासोबत लग्न केलं होतं. हसीन एकेकाळी चिअरलीडर होती.

शमी आणि हसीन जहां यांना एक मुलगीदेखील आहे. दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 2018 पासून ते वेगळे राहत आहेत.