एकेकाळी टीममध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणून विराट ढसाढसा रडलेला

16 November 2023

Created By: Chetan Patil

विराटने आज क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडला

विराटने ODI सामन्यांमध्ये 50 वं शकत करुन सचिनचा रेकॉर्ड मोडलाय

पण एक काळ असा होता की, टीममध्ये सिलेक्शन झालं नाही म्हणून विराट ढसाढसा रडलेला

विराटला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागलाय.

एकदा विराटचं टीममध्ये सिलेक्शन झालं नव्हतं. त्यामुळे तो रात्रभर रडला होता.

विराटने काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की, स्टेट टीमसाठी त्याचं सिलेक्शन झालं नाही म्हणून तो रात्रभर रडला होता

रात्री तीन वाजेपर्यंत विराट रडला होता, तसेच आपण रिजेक्ट झालोय या विचाराने तो खूप त्रस्त होता

पण विराटने जोमाने सराव केला. त्याचं 2006 मध्ये दिल्ली टीममध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर दोन वर्षात त्याला टीम इंडियात संधी मिळाली होती.

विराटने 2008 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तेव्हा विराट टीमचा कर्णधार होता.