विराट कोहलीने मोठं मन दाखवलंय

13 November 2023

Created By: Chetan Patil

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड असा नुकताच सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक केलं.

टीम इंडियाचा या सामन्यात 160 धावांनी विजय झाला.

या सामन्यानंतर विराट कोहलीने एका खेळाडूला विशेष गिफ्ट दिलं.

विशेष म्हणजे याच खेळाडूने विराटची विकेट घेतली होती.

नेदरलँडच्या या खेळाडूचं नाव रॉलेफ वॅन डर मर्व असं आहे. याच गोलंदाजाने विराटची विकेट घेतली.

रॉलेफ वॅन डर मर्व या खेळाडूचा यावर्षाचा वर्ल्ड कप हा शेवटचा ठरु शकतो. कारण हा खेळाडू आता 38 वर्षांचा झालाय.

विराटने नेदरलँडसोबतची मॅच संपल्यानंतर रॉलेफ वॅन डर मर्वला विशेष गिफ्ट दिलं. विराटने आपल्या ऑटोग्राफची जर्सी मर्वला गिफ्ट म्हणून दिली.