पाकिस्तानच्या गोलंदाजाची खराब कामगिरी

11 November 2023

Created By: Chetan Patil

पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रऊफ याची यावर्षीच्या वनडे वर्ल्ड कपमधील कामगिरी खूप खराब ठरली

पाकिस्तान संघ वर्ल्ड कपमधून बाहेर झालाय.

पाकिस्तानचा परफॉर्न्स या वर्ल्ड कपमध्ये फार खराब राहिला.

हारिस रऊफ याची कामगिरी खूप वाईट राहिली.

वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त रन देणारा गोलंदाज म्हणून रेकॉर्ड हारिसच्या नावावर झालाय.

यावर्षीच्या वर्ल्ड कप सीझनमध्ये हारिस रऊफ याने 9 सामन्यांमध्ये 533 रन दिले आहेत.  

गेल्या वर्ल्ड कपमध्ये आदिल रशीदने 11 सामन्यांमध्ये 526 रन दिले होते.

पण हारिसने यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये आदिल रशीदचाही रेकॉर्ड मोडला आहे.