getty

WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?

27 जून 2025

Created By:  संजय पाटील

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडच्या जो रुटच्या नावावर आहे. रुटने 65 सामन्यांमध्ये 5 हजार 624 धावा केल्या आहेत.

मार्नस लबुशेन दुसऱ्या स्थानी, लबुशनने 53 सामन्यांमध्ये 4 हजार 225 धावा केल्या आहेत.

स्टीव्हन स्मिथ तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. स्मिथने 53 सामन्यांमध्ये 4 हजार 151 धावा केल्या आहेत.

बेन स्टोक्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्टोक्सने डब्ल्यूटीसी स्पर्धेतील 54 सामन्यांमध्ये 3 हजार 365 धावा केल्यात.

ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा याने या स्पर्धेतील 41 सामन्यांमध्ये 3218 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड याने 50 सामन्यांमध्ये 3 हजार 135 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानच्या बाबर आझम याने 36 सामन्यांमध्ये 2 हजार 998 रन्स केल्या आहेत.

केन विलियमसन याने 28 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 822 धावा केल्या आहेत.

झॅक क्रॉली या यादीत नवव्या स्थानी पोहचला आहे. क्रॉलीने या स्पर्धेतील 48 सामन्यांमध्ये 2 हजार 820 धावा केल्या आहेत.

तर टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत दहाव्या क्रमांकावर, रोहितने 40 सामन्यांमध्ये 2 हजार 716 धावा केल्या आहेत.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या