कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, जो रुट कितव्या स्थानी?

19 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.

सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा केल्या आहेत. 

या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंग दुसऱ्या स्थानी आहे. पॉन्टिंगने 168 सामन्यांमध्ये 13 हजार 378 धावा केल्या आहेत. 

तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस आहे. जॅकच्या  नावावर 166 सामन्यांमध्ये 13  हजार 289 धावा आहेत. 

चौथ्या क्रमांकावर 'द वॉल' अर्थात भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड विराजमान आहे. द्रविडने 164 सामन्यांमध्ये 13 हजार 288 धावा केल्या आहेत.

तर इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट हा या यादीत पाचव्या स्थानी आहे. 

जो रुट याने आतापर्यंत 156 सामन्यांमध्ये 13 हजार 259 धावा केल्या आहेत.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?