5 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकसेएक दिग्गज फलंदाजांनी धमाका केलाय. त्यापैकी सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
कसोटीत सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.
सचिनने 200 कसोटी सामन्यांध्ये 53.78 च्या सरासरीने 51 शतकं झळकावली आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस याने 166 सामन्यांमध्ये 45 शतकं झळकावली आहेत. जॅक या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
इंग्लंडच्या जो रुट याने यादीत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रुटने 163 सामन्यांमध्ये 41 शतकं लगावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंग याने 41 कसोटी शतकं लगावली आहेत.
श्रीलंकेचा माजी विकेटकीपर फलंदाज कुमार संगकारा याने 134 सामन्यांमध्ये 38 शतकं झळकावली होती.