टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड,  रुटने द्रविडला पछाडलं

11 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

जो रुटने इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत करुण नायर याचा कॅच घेतला.  रुटने यासह सर्वाधिक कॅच घेण्याचा राहुल द्रविडचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

जो रुट याच्या नावावर आता 211 कॅचेसची नोंद झाली आहे.

टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याच्या यादीत राहुल द्रविड याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. द्रविडच्या नावावर 210 कॅचेस आहेत.

या यादीत तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने आहे. जयवर्धने याने 205 कॅचेस घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ याने कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 200 कॅचेस घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस याने कसोटी कारकीर्दीत 200 कॅचेस घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग याने टेस्ट करियरमध्ये एकूण 196 कॅचेस घेतल्या होत्या.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या