12 नोव्हेंबर 2025
भारत-दक्षिण आफ्रिका 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने उभयसंघातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माजी दिग्गज अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे.
अनिल कुंबळे यांनी 21 कसोटी सामन्यांमधील 40 डावांत 84 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3 वेळा 5 पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या. आहेत.
त्यानंतर माजी गोलंदाज डेल स्टेन याचा नंबर लागतो.स्टेनने 14 सामन्यांमध्ये 65 विकेट्स मिळवल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मोर्कल यांचा या यादीत समावेश आहे.
मोर्कलने 58 विकेट्स घेतल्या आहेत. मोर्कल पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये भारताच्या तिघांचा समावेश आहे. यात अनिल कुंबळे व्यतिरिक्त जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंह याचा समावेश आहे.