18 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा 18 डिसेंबरला 39 वर्षांचा झाला. उस्मानचा जन्म 1986 साली झाला होता.
उस्मानने 39 व्या वाढदिवशी 39 वर्षांआधीच्या विक्रमाची बरोबरी केली.
ख्वाजा वाढदिवशी एडलेड कसोटीतील दुसऱ्या दिवशी ऑनफिल्ड होता. ख्वाजाने यासह एका विक्रमाची बरोबरी केली.
ख्वाजा बॉब हॉलँड याच्यानंतर 39 व्या वर्षी कसोटी सामना खेळणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. हॉलँडने 1986 साली वयाच्या 39 व्या सामना खेळला होता.
एडलेड कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये उस्मान ख्वाजा याचं नाव नव्हतं.
मात्र स्टीव्हन स्मिथ याची तब्येत बिघडल्याने उस्मान ख्वाजा याला संधी मिळाली.
उस्मान ख्वाजा याने इंग्लंड विरुद्ध एडलेड कसोटीतील पहिल्या डावात 82 धावा केल्या होत्या.