24 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
विराटने vht स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्लीकडून आंध्र प्रदेश विरुद्ध 101 बॉलमध्ये 131 रन्स केल्या. विराटने या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार लगावले.
विराटने या खेळीदरम्यान लिस्ट ए करियरमध्ये 330 डावांत 16 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने यासह सचिनला पछाडलं. सचिनने 391 डावांत ही कामगिरी केली होती.
विराटला आता सचिनचा आणखी वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. विराटला त्यासाठी 3 शतकांची गरज आहे.
विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकूण 58 शतकं झळकावली आहेत. तर सर्वाधिक लिस्ट ए शतकांचा विक्रम हा सचिनच्या नावावर आहे.
सचिनने लिस्ट ए करियरमध्ये 60 शतकं झळकावली आहेत. त्यामुळे विराटला 3 शतकांची गरज आहे.
विराटने लिस्ट ए करियरमध्ये 58 शतकं, 84 अर्धशतकं झळकावली आहेत.
तसेच विराट व्यतिरिक्त या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबईसाठी रोहित शर्मा यानेही शतक झळकावलं.