Ishan Kishan : वर्ल्ड कपसाठी संधी मिळताच ईशान किशनला मोठी जबाबदारी

22 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

इशान किशन याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धमाका केला. त्यानंतर या खेळाडूला गूड न्यूज मिळाली आहे.

ईशान किशनची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेला 24 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ईशानने  त्याच्या नेतृत्वात झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली.  ईशानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 49 बॉलमध्ये 101 रन्स केल्या.

ईशानने या स्पर्धेत सर्वाधिक 517 धावा केल्या. ईशानने या दरम्यान 2 शतकं झळकावली.

ईशानचं या कामगिरीनंतर टीम इंडियात  कमबॅक झालं. त्याचा टी 20i वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी समावेश करण्यात आलाय.

ईशान किशनला वनडे टीममध्ये कमबॅक करण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आपली छाप सोडावी लागेल. ईशानसाठी ही फार मोठी संधी आहे.

ईशानच्या नेतृत्वात झारखंड 24 डिसेंबरला कर्नाटक विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.