मुंबईचा सलग दुसर्‍या विजयसाठी सज्ज, रोहितच्या कामगिरीकडे लक्ष  

25  डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

मुंबईने शार्दुल ठाकुर याच्या नेतृत्वात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मुंबईने सिक्कीमला पराभूत केलं.

मुंबईने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला. रोहित शर्मा हा या विजयाचा हिरो ठरला.  

रोहित शर्माने चौफेर फटकेबाजी करुन सिक्कीम विरुद्ध दीडशतकी खेळी केली.

रोहितने सिक्कीम विरुद्ध 94 बॉलमध्ये 155 रन्स केल्या.

आता मुंबई या मोहिमेतील दुसरा सामना 26 डिसेंबरला खेळणार आहे. 

मुंबईसमोर या सामन्यात उत्तराखंडचं आव्हान असणार आहे.

क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्मा याच्याकडून उत्तराखंड विरुद्ध सिक्कीम सारखीच खेळी अपेक्षित असणार आहे.