ताकदीसाठी विराट कोहली खातो हे स्पेशल Meat, याच्या पुढे चिकन-मटण पण फेल

5 november 2025

Created By: Atul Kamble

इंडियन क्रिकेटर विराट कोहली फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे.तो त्याच्या डाएटची खास काळजी घेतो. तो नॉनव्हेज खात नाही.

विराट शाकाहारी असून एक खास प्रकारचे Meat खूप आवडीने खातो.

 हे Meat प्रोटीनच्या बाबतीत चिकन- मटण दोघांनाही मागे टाकते. जर तुम्हालाही विराट सारखे चपळ बनायचे असेल तर हे Meat डाएटमध्ये समाविष्ठ करु शकता.

शाकाहारी असलेला विराट कोहली हे   Meat आवडीने कसा खातो हे पाहूयात..

७ वर्षांचा विराटचा फिटनेस कमालचा आहे.त्याच्यापेक्षा लहान क्रिकेटपटूंनाही तो मागे टाकतो. शाकाहारी विराट Mock Meat खातो. हा प्लांट बेस्ड Meat खास वेगन लोकांसाठी असतो. 

 याची टेस्ट, टॅक्सचर आणि फायदे नॉनव्हेज सारखे आहेत. हे वनस्पतींपासून बनलेले मॉक मिट आहे.फणस,सोया,व्हीट प्रोटीन,ग्लुटेन,मशरुम, डाळी आणि ज्वारी, नाचणी बाजरी असे पदार्थांपासून हे तयार होते.

चाप,नगेट,डिमसम्स,सॉसेज सारखे पदार्थ विराटच्या डाएटचा हिस्सा आहेत. हे पदार्थ टेस्टी आणि हेल्दीही आहेत.

मॉक मिटमध्ये प्रोटीन सोबत फायबर आणि विटामिन्सचे प्रमाण मोठे असते आणि कॅलरीही कमी असते.

 मॉक मिट आणि प्लांट बेस्ड मिटला प्रत्येक शाकाहारी त्याच्या डाएटमध्ये सामील करुन चिकन-मटणासारखे प्रोटीन मिळवू शकतो.