मेंदूला तल्लख करतात हे 10 पदार्थ,  पाहा कोणते ?

5 november 2025

Created By: Atul Kamble

तुमची स्मृती कमजोर झाली असेल तर 10 पदार्थांच्या सेवनाने तुमचा मेंदू तल्लख होऊ शकतो. कोणते हे पदार्थ पाहूयात.

हिरव्या पालेभाज्या - पालक,मेथी, चाकवत, राईची भाजी रोज खाव्यात त्यात व्हिटामिन्स K असते.जे मेंदूसाठी गुणकारी असते.

अंडी - प्रोटीनचा चांगला सोर्स असतात. त्यात कोलाईन नावाचे तत्व असते ते मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे असते.

नट्स - मुठभर नट्स रोज खावेत.त्यातील हेल्दी फॅट्स आणि एंटीऑक्सीडेंट्स तत्वे ब्रेनच्या हेल्थसाठी चांगली असतात.

 हळद - यात मसाल्यात करकुमिन तत्व असते. जे मेंदूच्या नसातील रक्ताचा वेग वाढवते. त्याने मेंदूचे आरोग्य चांगले होते.

भोपाळ्याच्या बिया - मेंदूला एक्टीव्ह करण्यासाठी यात ओमेगा-3,फॅटी एसिड,व्हिटामिन्स K,झिंक, कॉपर, आयर्न आणि मॅग्निशियम असते.

संत्री - व्हिटामिन्स C एक पॉवरफुल एंटीऑक्सीडेंट आहे.जे सेरोटोनिन सारख्या न्युरोट्रांसमीटरच्या प्रोडक्शनला मदत करते.आणि संत्र्यात ते मोठ्या प्रमाणावर असते.

ग्रीन टी - यात एंटीऑक्सीडेंट्स सह कॅटेचिन आणि पॉलीफेनोल असते. मेंदूच्या पेशींसाठी ते चांगले असते.

 डार्क चॉकलेट्स - यात कॅफीन,फ्लॅवोनॉयड्स आणि अनेक एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे मूड चांगला करण्यात मदत करतात.

कॉफी - डार्क चॉकलेट्ससारखे कॉफीतही फ्लॅवोनॉयड्स आणि अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेट्स असतात, ते मेंदूसाठी चांगले असतात.

 फॅटी फिश - माशात मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 फॅटी एसिड असते. जे स्मरणशक्ती वाढवण्याचा चांगला सोर्स आहे.