3 november 2025
Created By: Atul Kamble
सणासुदीत भरपूर अनहेल्दी खाल्ल्याने वजन वाढलंय, त्यामुळे वजन कमी करायचे आहे तर हे उपाय पाहा
डायटिशियन नमामी अग्रवाल यांनी बॉडी डिटॉक्स करण्याचे उपाय सांगितले आहेत. त्यांनी दिलेल्या टीप्स पाहूयात
तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाणे टाळावे,त्याऐवजी खिचडी आणि फायबरने भरपूर आहार करावा
शरीरास हायड्रेटीड राखणे गरजेचे आहे.नारळपाणी,साधे पाणी, हर्बल चहाचे सेवन करु शकता.
अनहेल्दी खाल्ल्याने डायजेशन बिघडते. त्यासाठी सकाळी उपाशी पोटी रात्री भिजवलेले जिरे आणि ओव्याचे पाणी प्यावे.
लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हळदीचे दूध,आवळा शॉट्स आणि बिटचे सलाड खाऊ शकता.हळदीतील करक्युमिन लिव्हरसाठी चांगले असते.
बॉडी डिटॉक्स करण्यासोबत वर्कआऊट करणे गरजेचे असते. बाहेरचे खाऊ नये, घरचे जेवण घ्यावे.यामुळे डिटॉक्सिफिकेशनला मदत होते.