आशिया कपचा हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर, काय ते वाचा

1 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण टी20 फॉर्मेट असल्याने विराट कोहली खेळणार नाही. 

आशिया कप टी20 असो की वनडे, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर विराट कोहलीचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 

2012 आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळला गेला. तेव्हा विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती. आजही हा विक्रम कायम आहे. 

गेल्या 13 वर्षांत कोणत्याही फलंदाजाला एका डावात इतक्या धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे वनडेतील हा विक्रम पुढच्या वनडे फॉर्मेटपर्यंत कायम असेल.

विराट कोहली टी20 फॉर्मेटमध्येही टॉपला आहे. त्याने 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली होती. 

विराट कोहलीचा हा विक्रम आता सुरु होणाऱ्या टी20 आशिया कप स्पर्धेत कोण मोडेल याकडे लक्ष असेल.

विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 50हून अधिक शतके झळकावली आहेत. तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे फक्त एक शतक आहे. 

आर अश्विनच्या आयपीएलमध्ये या चार बाबतीत सरस