विराट कोहलीची जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटपटूआहे. इंग्लंड क्रिकेटही आता याचा फायदा घेत आहे.
आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यासाठी इंग्लंडने तयारी सुरु केली आहे.
दोन्ही संघात एकूण पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. चौथा सामना मॅनचेस्टरमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी लँकाशर क्रिकेट क्लबने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याची तिकीट विक्री सुरु झाली आहे.
लँकाशरने आपल्या पोस्टमध्ये इंग्लंडच्या खेळाडूऐवजी विराट कोहलीला स्थान दिलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
इंग्लंड क्रिकेट कुठे ना कुठे विराट कोहलीच्या प्रसिद्धीचा फायदा घेत आहे. यामुळे जास्तीत जास्त तिकीट विक्री होईल.
इंग्लंड भारत कसोटी मालिकेची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. शेवटचा सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होईल.
विराट कोहलीच्या कसोटी करिअरच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काही खास करू शकला नाही.
आयपीएल स्पर्धेत मैदानात सामना सुरु असतान खेळाडूच्या बॅटची तपासणी, काय आहे आयसीसीचा नियम?