विराटचा नादच नाय, अर्धशतक-शतकाशिवाय विषयच नाय, किंग कोहलीचा धमाका सुरुच

26  डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

भारताचा फलंदाज विराट कोहली सातत्याने आणि खोऱ्याने धावा करत आहे. विराटला रोखणं गोलंदाजांसाठी अवघड झालंय. 

विराटने अनेक वर्षांनी vht स्पर्धेत कमबॅक केलं आणि सलग 2 सामन्यांत धमाका केला.

विराटने आंध्र प्रदेश विरुद्ध 131 धावा केल्या. तर गुजरात विरुद्ध विराटने 61 चेंडूत 77 धावा चोपल्या. 

विराटच्या या अशा खेळीमुळे चाहत्यांना त्याच्या सोबत 2 महिन्यांआधी घडलेला प्रकार आठवला.

विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजमधील सलग 2 सामन्यांमध्ये झिरोवर आऊट झाला होता.

विराटने तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. तेव्हापासून विराटने प्रत्येक खेळीत  किमान अर्धशतक केलंय. 

विराटने आतापर्यंत गेल्या सलग 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्यात. विराटने 74*, 135, 102, 65, 131 आणि 77 धावा केल्यात.