विराटला या चार गोलंदाजांची वाटत होती भीती, स्वत:च केला खुलासा

22  जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

विराट कोहली हा एक महान फलंदाजांपैकी असून त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.

विराट कोहली टेस्ट आणि टी20 फॉरमॅटमधून निवृत्त झाला आहे. पण त्याने फॉरमॅटनुसार 4 गोलंदाजांनी त्रास दिल्याचं सांगितलं.

इंग्लंडचा माजी दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये खूप त्रास दिल्याचं विराट कोहलीने कबूल केले आहे.

विराटने सांगितले की वेस्ट इंडिजचा गूढ फिरकी गोलंदाज सुनील नारायणने त्याला टी20 मध्ये खूप त्रास दिला.

वनडे फॉरमॅटमध्ये कोहलीला श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा आणि इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद यांनी त्रास दिला. 

विराट कोहली आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये बांग्लादेश दौऱ्यावर जाईल तेव्हा त्या संघात असू शकतो.

रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने काय होते?