7 नोव्हेंबर 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टी 20i सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या.
सुंदरने अवघ्या 8 चेंडूंमध्ये 3 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स मिळवल्या. वॉशिंग्टनने यासह विक्रमी कामगिरी केली.
सुंदरने सर्वात कमी धावा देत 3 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याबाबत भुवनेश्वर कुमारला मागे टाकलं. भुवीने 4 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
सुंदरने या मालिकेत 2 सामने खेळले आहेत. सुंदरने एका सामन्यात बॅटिंगने टीमला विजयी केलं. तर एका सामन्यात बॉलिंगच्या जोरावर जिंकवलं.
सुंदरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होबार्टमध्ये 23 बॉलमध्ये 4 सिक्ससह 49 रन्स केल्या.
सुंदरने 3 विकेट्स घेण्यासह टी 20i क्रिकेटमध्ये खास कामगिरी केली. सुंदरने विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं.
सुंदरने 53 टी 20i डावात 51 विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरने 6.9 च्या इकॉनमीने ही कामगिरी केली आहे.