IPL 2024 च्या फायनलमध्ये भले SRH चा पराभव झाला. पण या टीमची मालकीण काव्या मारन चर्चेत आहे. 

काव्या मारन देशातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे.

फोर्ब्स नुसार, काव्याचे वडील कलानिधी मारन यांची नेटवर्थ जवळपास 26,000  कोटीच्या घरात आहे. 

काव्या मारनने चेन्नईच्या स्टील स्टेला मारिस कॉलेजमधून कॉमर्स शाखेतून ग्रॅज्युएशन केलय. तिच्याकडे MBA ची डीग्री सुद्धा आहे.

काव्या मारन आपल्या वडिलांचा बिझनेस पाहते. ती सन ग्रुपची बोर्ड मेंबर आणि सन टीव्हीचा OTT प्लॅटफॉर्म सन नेक्स्टची प्रमुख आहे. 

सन ग्रुप भारतीय मीडिया समूह आहे. 1992 साली कलानिधी मारन यांनी या समूहाची स्थापना केली. 

सन ग्रुपकडे टेलीविजन मीडियाशिवाय FM रेडिओ स्टेशन, दैनिक वृत्तपत्र आणि T20 फ्रेंचायजी आहे.