ज्या रात्री पंजाब किंग्सने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला,  त्या रात्री प्रिती  झिंटा रडली.

प्रिती झिंटा आयपीएलमध्ये आपली टीम पंजाब किंग्सला सपोर्ट् करताना उत्साहाने भरलेली असते. 

असे अनेक फोटो आहेत, ज्यात विजयानंतर प्रितीने सेलिब्रेशन केलय आणि पराभवानंतर ती निराश दिसलीय. 

ज्या रात्री पंजाब किंग्सने KKR विरुद्ध 262 धावांच टार्गेट चेज केलं, त्या रात्री प्रितीने तो सामना पाहिला नाही. 

प्रिती त्या रात्री 'लाहोर 1947' च्या शूटिंगमध्ये होती. हे खूप कठीण शूट होतं. गर्मी होती आणि तिचा रडण्याचा सीन चाललेला.  

आमच्या टीमने टार्गेट चेज करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, त्यावेळी मी दुसरीकडे कुठेतरी रडत होती, असं प्रिती म्हणाली.

प्रिती आमिर खान प्रोडक्शनच्या 'लाहोर 1947' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. सनी देओलही या चित्रपटात आहे.