इंडियन प्रीमियम लीगचा अंतीम सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि पंजाब किंग्स दरम्यान होत आहे.

3 june 2025

IPL जगातील सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग म्हणून प्रसिद्ध झाली आहे. सन 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात कोणत्या शहरातून झाली, याची माहिती आहे का?

इंडियन प्रीमियम लीगचा पहिला सामना 18 एप्रिल 2008 रोजी झाला. हा सामना कर्नाटकमधील बंगळूरमध्ये झाला होता.

आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाइट राइडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळूर दरम्यान खेळाला गेला होता. 

आयपीएलचा पहिला सामना बंगळूरमधील चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवर खेळवण्यात आला. या स्टेडियमच्या नावावर एक विक्रमसुद्धा आहे.

कर्नाटक स्‍टेट क्रिकेट असोसिएशनच्या दाव्यानुसार, चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियम जगातील एकमेव सोलर पॉवर्ड क्रिकेट स्‍टेडियम आहे. या स्टेडियमची 40 हजार प्रेक्षकांची क्षमता आहे. 

पहिल्या आयपीएलमध्ये विजेतेपद राजस्थान रॉयल्स या संघाने पटकावले होते.