कोण आहे कश्मीरा परदेशी ? या क्रिकेटपटूशी जोडले जातंय नाव
Created By: Atul Kamble
5 April 2026
आयपीएल २०२६ मध्ये एक मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर झळकत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यादरम्यान सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले
या मिस्ट्री गर्लला पंजाब किंग्सला पाठींबा देताना पाहिले गेले. जिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिचे नाव कश्मीरा परदेशी म्हटले जात आहे.
कश्मीरा परदेशी ही एक अभिनेत्री आहे. तमिळ,तेलगु आणि हिंदी चित्रपटात तिने काम केले आहे. कश्मीराचे सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे २.२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
कश्मीरा परदेशी हीचे नाव पंजाब किंग्सचा तरुण खेळाडू नेहाल वढेरा याच्याशी जोडले जात आहे.ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला जात आहे.
२५ वर्षांचा नेहाल वढेरा साल २००३ पासून आयपीएलचा हिस्सा आहे. पंजाबच्या आधी मुंबई टीमसाठी दोन सिझन तो खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत.
कश्मीरा परदेशी हीने साल २०१८ मध्ये आलेल्या तेलगु चित्रपट 'नर्तनशाला' मध्ये भूमिका करुन एक्टींग करीयरची सुरुवात केली आहे.
कश्मीरा परदेशी हीने साल २०१९ मध्ये तमिळ चित्रपट 'सिवल्लु मंजल पचई' मध्ये काम केले होते. हिंदी चित्रपट 'मिशन मंगल' मध्येही ती दिसली होती.