हाय बीपीपासून स्वत:चा बचाव कसा कराल ?

Created By: Atul Kamble

5 April 2026

खराब जीवनशैली, तणाव, चुकीचा आहार, झोपेची कमतरता यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होत असतो. यापासून कसे वाचायचे ते पाहूयात

 मीठाचे प्रमाण अत्यंत कमी करावे.जास्त मिठाने ब्लड प्रेशर वाढू शकते.

 दर दिवशी किमान ३० मिनिटे एक्सरसाईज करावे. त्यामुळे शरीर एक्टीव्ह रहाते. ब्लड प्रेशर नियंत्रित राहाण्यास मदत होते.

जास्त तणाव घेतल्याने बीपी वाढू शकतो. यासाठी योगासने, मेडिटेशन आणि स्वत:च्या आवडीची कामे करावीत.त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले होते.

फळे, भाज्या, भरड धान्ये, लो फॅट फूड्सचा आहारात समावेश करावा, जंक फूड, तळलेले पदार्थ खाऊ नयेत.त्यामुळे बीपी नियंत्रणात येतो.

वाढते वजन हे हाय बीपीचे कारण आहे. संतुलित डाएट आणि नियमित एक्सरसाईजने वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.

अल्कोहोल आणि धुम्रपानामुळे बीपी वेगाने वाढतो.या सवयींपासून दूर राहून उच्च रक्तदाबाच्या धोक्यापासून वाचू शकतात.