टी20 संघात अक्षर पटेलची जागा घेतलेला शाहबाज अहमद कोण?
15 December 2025
Created By: Rakesh Thakur
आजारपणामुळे अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्यात आले. त्याच्या जागी शाहबाज अहमदची निवड करण्यात आली . हा खेळाडू दोन वर्षांनी भारतीय संघात परतला आहे.
शाहबाज अहमद हा डावखुरा अष्टपैलू खेळाडू आहे. तो शेवटचा भारतीय संघाकडून 2023 मध्ये खेळला होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो आणि सध्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे.
अक्षर पटेलप्रमाणेच शाहबाज हा डावखुरा गोलंदाज आणि फलंदाज आहे. तो भारताकडून एकदिवसीय आणि टी20 मध्ये खेळला आहे.
शाहबाजने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रांची येथे एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्याने 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.
शाहबाजने आतापर्यंत भारतासाठी तीन एकदिवसीय आणि दोन टी20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण पाच विकेट्स घेतल्या आहेत. शाहबाजने भारतासाठी शेवटचा 2023 च्या आशियाई स्पर्धेत खेळला होता.
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?