एमएस धोनी पुन्हा सीएसकेचे कर्णधारपद सोडणार? झालं असं की...

3 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंग धोनीने एक मोठे विधान केले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचे नेतृत्व होते. दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा संघाची कमान मिळाली.

आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की 2026 च्या हंगामातही धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसेल का?

संघाच्या खराब फलंदाजीबद्दल चर्चा करताना धोनी म्हणाला की, ऋतुराज गायकवाड पुढील हंगामात पुनरागमन करेल. 

'आम्हाला आमच्या फलंदाजीची थोडी चिंता आहे पण ऋतुराज गायकवाडच्या आगमनानंतर ती देखील चांगली होईल. ऋतुराजला गेल्या हंगामात दुखापत झाली होती पण आता तो पुनरागमन करत आहे.'

धोनीच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाडच्या पुनरागमनानंतर पुन्हा कर्णधारपद सोडणार का?

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, फ्रँचायझीने 14 पैकी फक्त चार सामने जिंकले. तर 10 सामन्यात पराभव झाला.

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा