WPL 2026 : गुजरातकडून साडे चार पट रक्कम, कोण आहे अनुष्का शर्मा?

28 नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

डब्ल्यूपीएल 2026 च्या मेगा ऑक्शनमधून आरसीबी अनुष्का शर्मा हीला घेण्यात अपयशी ठरली.

अनुष्का शर्माचं वय 22 वर्ष आहे. ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशचं प्रतिनिधित्व करते. अनुष्का ऑलराउंडर आहे. 

अनुष्कासाठी ऑक्शनमध्ये आरसीबी आणि गुजरातमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र गुजरातला यश आलं. 

अनुष्का शर्मा हीला ऑक्शनमधून तिच्या बेस प्राईजपेक्षा साडे चार पट जास्त रक्कम मिळाली. 

गुजरात जांयट्सने अनुष्का शर्मा हीच्यासाठी  45 लाख रुपयांची बोली लावली. गुजरातने अशाप्रकारे अनुष्काला आपल्या गोटात घेतलं. 

अनुष्काने नुकत्याच झालेल्या इंटरझोनल स्पर्धेत सेंट्रल झोनचं प्रतिनिधित्व केलं. अनुष्काने या स्पर्धेत एकूण 155 धावा केल्या. तसेच 7 विकेट्स मिळवल्या.

अनुष्काने सिनिअर वूमन्स टी 20i स्पर्धेत एमपीसाठी चमकदार कामगिरी केली. अनुष्काने 207 धावा केल्या.