Icc Test Ranking : टॉप 10 मध्ये 3 भारतीय, नंबर 1 कोण?
16 जुलै 2025
Created By: संजय पाटील
आयसीसीने 16 जुलैला कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे 3 फलंदाज आहेत.
टीम इंडियाच्या तिन्ही फलंदाजांना रँकिंगमध्ये फटका बसला आहे. तिघांनाही याआधीचं आपलं स्थान कायम राखण्यात अपयश आलं आहे.
ओपनर यशस्वी जैस्वाल याला एका स्थानाचा फटका बसला आहे. यशस्वीची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याला 1 स्थानाचं नुकसान झालं आहे. पंत आठव्या क्रमांकावर आहे.
कर्णधार शुबमन गिल याची थेट 3 स्थानांनी घसरण झाली आहे.
कॅप्टन शुबमन गिल हा बॅटिंग रँकिंगमध्ये नवव्या स्थानी फेकला गेला आहे.
तर इंग्लंडचा जो रुट याने पुन्हा पहिलं स्थान काबीज केलंय. त्याने सहकारी हॅरी ब्रूक याला मागे टाकत ही कामगिरी केलीय.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा