25 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी झिंबाब्वे संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतून दिग्गज खेळाडूचं कमबॅक झालं आहे.
जवळपास 4 वर्षांनंतर माजी कर्णधार आणि विकेटकीपर असलेल्या ब्रँडन टेलर याचं कमबॅक झालं आहे.
ब्रँडन टेलर याने अखेरचा एकदिवसीय सामना हा 2021 साली आयर्लंड विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून ब्रँडन क्रिकेटपासून दूर होता.
ब्रँडनने तेव्हा निवृत्तीची घोषणा केली होती. ब्रँडनला तेव्हा गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता.
त्यानंतर ब्रँडन मॅच फिक्सिंगच्या आरोपात दोषी आढळला. त्यामुळे आयसीसीने ब्रँडनवर 3 वर्षांची बंदी टाकली होती. बंदीची 3 वर्ष ऑगस्ट 2025 मध्ये पूर्ण झाली.
ब्रँडनने त्यानंतर निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. ब्रँडनने त्यानतंर न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना खेळला.
ब्रँडनने एकदिवसीय कारकीर्दीतील 205 सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 6684 धावा केल्या आहेत. ब्रँडनने या दरम्यान 11 शतकं आणि 39 अर्धशतकं ठोकली आहेत.