मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात सावत्र पिता परवेज टाकला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

14 वर्षापूर्वीच्या प्रकरणात लैला, तिची आई आणि चार भावा-बहिणींची सावत्र पित्यानेच हत्या केली. त्यानंतर मृतदेह फार्म हाऊसमध्येच दफन केले. 

अनेक वर्षांनी हे प्रकरण चर्चेत आलय. लैला खान मूळची पाकिस्तानी होती. तिच खरं  नाव रेशमा पटेल होतं. 

बॉलिवूडमध्ये येण्याआधी तिने लैला खान हे नाव धारण केलं. 2002 मध्ये कन्नड चित्रपट 'मेकअप'मधून तिने  अभिनयाची सुरुवात केली.

लैलाने 2008 साली 'वफा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  डेब्यु केला. राजेश खन्ना या  चित्रपटात हिरो होते. 

राजेश खन्ना तिच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. पण लैलाने त्यांच्यासोबत बिनधास्तपणे बोल्ड सीन केले. 

बोल्ड सीन देऊनही 'वफा' चित्रपट हिट झाला नाही. नंतर तिने 'फरार' चित्रपटातही  बोल्ड सीन दिले.   

लैलाची आई सेलिना पटेलने तीन लग्न केली. सेलिना यांचा पहिला पती नादिर शाह पटेलपासून लैलाचा  जन्म झाला.