यूपीएससीची आयएएस, आयपीएससाठी असलेली परीक्षा सर्वात कठीण आहे.

10 June 2025

प्रत्येक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमागे एक प्रेरक कथा असते. आयपीएस शालिनी अग्निहोत्रीचीही अशीच एक कथा आहे.

शालिनीच्या आईचा एक वेळा बसमध्ये अपमान झाला. त्याच घटनेने तिने पोलीस अधिकारी बनवण्याचा निर्णय घेतला. 

शालिनी यांनी कोणतेही कोचिंग न लावता यूपीएससी सेल्फ स्टडी करत क्रॅक केली. तिने ऑनलाइन क्लासेसवर विश्वास ठेवला. 

हिमाचल प्रदेशातील शालिनी शालेय शिक्षणातही हुशार होती. दहावीत 92 टक्के तर बारावीत 77 टक्के तिने मिळवले.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने हिमाचल विद्यापीठातून कृषी विषयात पदवी घेतली. त्यानंतर विज्ञानातून पदवीत्तर पदवी घेतली.

पदवीत्तर पदवी घेत असताना यूपीएससीचा अभ्यास सुरु केला. सेल्फ स्टडी करत यश मिळवले. 

यूपीएससीमध्ये शालिनीला 285वी रँक मिळाली. त्यानंतर तिची निवड आयपीएस म्हणून झाली.