यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे लाखो तरुणांचे स्वप्न असते. परंतु यश शेकडो लोकांना मिळते.

26 June 2025

काही व्यक्ती नोकरी करताना यूपीएससीची तयारी करतात अन् यश मिळवतात. त्या व्यक्तींमध्ये नेहा जैन यांचा समावेश आहे.

आयटीमधील चांगल्या पगाराची नोकरी करताना नेहा यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली अन् यश मिळवले.

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील मोरवा येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. 

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेहा यांनी दिल्ली गाठली. दिल्लीत पदवी घेतल्यानंतर आयटी कंपनीत रुजू झाल्या.

आयटी कंपनीच्या नोकरीत त्यांचे मन लागले नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी करताना यूपीएससीची तयारी सुरु केली.

नेहा यांनी यूपीएससीची प्रेरणा भाऊ हिंमाशू जैन यांच्याकडून मिळाले. ते आयएएस आहेत.

पहिल्या दोन प्रयत्नात नेहा यांना यश आले नाही. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. अभ्यास सुरु ठेवला. 

तिसऱ्या प्रयत्नात नेहा यांना यश आले. त्यांनी यूपीएससीमध्ये 152 वी रँक मिळवली. त्यानंतर त्या आयपीएस झाल्या.