Aami Khan : रीना-किरणशी घटस्फोट, पण आमिरचं त्या दोघींशी आता नातं कसं?

8 March 2025

Created By : Manasi Mande

एका कार्यक्रमात आमिर खान करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलला. घटस्फोटानंतर दोन्ही माजी पत्नींशी त्याचं नातं कसं आहे, हेही आमिरने सांगितलं.

आमिरची दोन लग्नं झाली. रीना दत्ताशी त्याने पहिलं लग्न केलं, तिला घटस्फोट दिल्यावर तो किरण रावशी विवाहबद्ध झाला. पण नंतर तेही विभक्त झाले.

त्यानंतर कुटुंबाबद्दल त्याला विचारण्यात आलं. माझ्या आयुष्यात जे महत्वाचे लोक आहे, ते माझ्यासोबत आहे, मी खूप भाग्यवान आहे, असं आमिर म्हणाला.

रीना आणि किरणसोबत मी आयुष्य घालवलं. आमचा घटस्फोट झाला तरी आम्ही एकमेकांचा आदर करतो.

त्या दोघीही माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्या पालकांशीही माझं अजूनही चांगलं नातं आहे.

आमिरने माजी पत्नी किरण रावसह 'लापता लेडीज' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट किरणनेच दिग्दर्शित केला पाहिजे, असं मला स्क्रीप्ट वाचताच समजलं, असं आमिरने नमूद केलं.

14 मार्चला आमिर त्याचा 60वा वाढदिवस साजरा करेल. मनात मी अजूनही 18 वर्षांचा आहे, पण आरश्यात पाहिल्यावर भ्रमाचा भोपळा फुटतो, असं आमिर म्हणाला.